शिक्षक नसलेल्या शाळांसाठी सुरेश लाड यांचे जिल्हा परिषदेत झोपून आंदोलन… विद्यार्थ्यांच शिक्षण बंद…आणि अधिकारी झोपेत…

0
4

कर्जत शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडमधून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येतेय.कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयात झोपून उपोषण सुरू केलंय.कारण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अजूनही शिक्षकच नाहीत.

रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी अजूनही शिक्षकांअभावी शिक्षणापासून वंचित आहेत.शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघूनही ते शाळांमध्ये रुजू होत नाहीत.या पार्श्वभूमीवर आज अलिबागच्या जिल्हा परिषदेत माजी आमदार सुरेश लाड यांनी धडक दिली..आणि थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच झोपून आंदोलन सुरू केलं… जोपर्यंत शिक्षकांना त्यांच्या नवीन बदलीच्या शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले जात नाहीत,तोपर्यंत मी इथून हलणार नाही.श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यांतून शिक्षक बदलून कर्जत भागात पाठवले गेले
पण मुख्य मुद्दा म्हणजे,या बदल्यांमुळे मूळ भागात शिक्षकच उरले नाहीत.त्यामुळे तिथे शाळा बंद होण्याची वेळ आली आहे.दुसरीकडे, बदलून गेलेले शिक्षक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ‘न सोडल्यामुळे’ नवीन शाळांमध्ये रुजू होत नाहीत.अशी दुहेरी समस्या निर्माण झाली आहे.

शिक्षण विभागाने सांगितले की,मंत्री आदिती तटकरे यांचे तोंडी आदेश असल्याने शिक्षकांना सोडले जात नाहीत.म्हणजेच, प्रशासकीय निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण झालाय.या परिस्थितीवर संतप्त झालेल्या लाड यांनी ‘शिक्षणाचा गोंधळ थांबवा’ अशी मागणी करत आंदोलन सुरू केलं आहे.”

आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याआधी प्रशासन जागं होईल का?शिक्षकांच्या नियुक्त्या वेळेत होतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.