माणगाव पुणे ताम्हिणी घाटात कारवर दगड कोसळून महिलेचा मृत्यू… माणगाव हादरलं! प्रवासादरम्यान डोंगरातील दगड कारमधून आत शिरला…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

दि. ३० ऑक्टोबर रोजी पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या फॉक्स वॅगन (MH 14 ML 7479) गाडीवर मौजे कोंडेथर गावच्या हद्दीतून जात असताना डोंगरावरून अचानक मोठ्या दरडीचा भाग कोसळला.त्या दरडीतून आलेला एक भला मोठा दगड थेट गाडीच्या सनरुफ काचेतून आत शिरला आणि चालकाच्या बाजूला बसलेल्या स्नेहल गोविंदास गुजराती (वय ४३, रा. चिंचवड, पुणे) यांच्या अंगावर पडला.या भीषण घटनेत त्यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. तात्काळ त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीयांचे नातेवाईक व मित्रपरिवार रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.