खार पूर्वेत सांडपाण्याचे महासंकट…नागरिक संतापले… शिवशक्ती ते मराठा कॉलनी पावसात नाही, सांडपाण्यात पोहताय नागरिक…

0
2

मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पवार):- 

मुंबईच्या खार पूर्वमधील जवाहर नगर परिसरातल्या गोळीबारानंतर नागरिकांची दुसरीच लढाई सुरू आहे… ती म्हणजे सांडपाण्यातून मार्ग काढण्याची… शिवशक्ती सोसायटी ते मराठा कॉलनी या रोडवर पावसाचं पाणी आणि सांडपाणी एकत्र मिसळल्यामुळे नागरिकांना अक्षरशः पाण्यात बुडलं जाऊन घर गाठावं लागतं.या अस्वच्छ पाण्यातून रोज जाणं येणं होत असल्याने दुर्गंधी,घाण, आणि रोगराईचं संकट वाढलं आहे.

नागरिकांचा आरोप आहे की,पालिका आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केलं आहे… रस्त्यांची दुरावस्था,नालेसफाईचा अभाव आणि पावसाचं अयोग्य नियोजन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.स्थानिक समाजसेवक डॉ. विवेकानंद जाजू आणि नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.नाहीतर येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत…