श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक चेतना यांचा सुंदर संगम विघवलीत बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर २०२५) पाहायला मिळाला. श्री कालभैरव जयंतीनिमित्त विघवलीतील ऐतिहासिक मंदिरात अत्यंत भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली. श्री सत्यनारायण पूजेची देखील या निमित्ताने सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. श्री आणि सौ. सोनाली समीर सालदूर यांनी पूजेचा मान स्वीकारला. गावातील सर्व नागरिक, महिला मंडळ आणि युवकवर्गाने या सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवला.
या पवित्र दिवशी विघवली ग्रामस्थांसाठी एक आनंदवार्ता घेऊन आली — कोविड महामारीपासून बंद असलेले वाचनालय पुन्हा सुरू करण्यात आले. हे वाचनालय १९९४ साली गोपाळ दौलतीशेट सापळे यांच्या स्मरणार्थ सापळे कुटुंबाच्या प्रयत्नातून उभारण्यात आले होते. या लायब्ररीने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा दिली होती, आणि आता पुन्हा एकदा वाचन संस्कृतीचा दिवा उजळला आहे.
लायब्ररीला आता टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, पुढारी तसेच स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रती दररोज सकाळी मिळणार आहेत. गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाने या पुनरारंभावर प्रचंड आनंद व्यक्त केला. या निमित्ताने अनेक वाचकांनी “वाचन हीच खरी साधना” असा संदेश देत वाचनालय पुन्हा सुरु झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
यादरम्यान सोहळ्यास अजित जंगम, अनंत विचारे, विठोबा दळवी, अरविंद सालदूर, बाळ दळवी, मोहन सुद, भागोजी सापळे, वसंत अर्बन, दत्ता उभारे, सुयश सालदूर, गणेश जंगम, शरद अर्बन, विकेश सापळे सह आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या सोहळ्यात उपस्थित गावकऱ्यांनी सापळे कुटुंबाचे मनःपूर्वक आभार मानले. या पुनरुज्जीवनामुळे गावातील तरुणाईला पुन्हा एकदा अभ्यास, विचार आणि समाजज्ञानाची प्रेरणा मिळणार आहे तसेच सर्व उपस्थित यांचे सापळे परिवार तर्फे सुधीर सापळे यांनी आभार मानले.
दरम्यानाचा काळात भावनेतून सामाजिक उभारणीचा आणि वाचन संस्कृतीचा संगम अशा या दिवशी विघवली गावाने खऱ्या अर्थाने एक नवा अध्याय सुरू केला — श्रद्धा आणि ज्ञानाचा सुंदर संगम झाल्याची दिशून आली, होय!
या दरम्यान सोहळा उत्सव समयात मृदंग दिल्या बद्दल मुकुंद सखाराम साठे यांना ग्रामस्थ तर्फे शॉल, श्रीफळ व पुस्पगुछ देऊन शानदार सत्कार करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.