रोह्यात गरजणारे महेंद्र दळवी अलिबागला कुठे आहेत?कार्यकर्त्यांमध्ये संताप… अलिबागचे रणांगण रिकामे…दळवी कुठे?शेकाप पूर्ण ताकदीने मैदानावर …

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

अलिबाग नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे.पक्षनिहाय हालचाली सुरू झाल्या आहेत.पण अलिबागमध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय आमदार महेंद्र दळवी अलिबागकडे कधी लक्ष देणार ? रोह्यात दररोज हस्तक्षेप करणारे, सभा घेणारे आणि माईकसमोर तटकरेंवर घणाघाती टीका करणारे महेंद्र दळवी अलिबाग नगरपालिकेबाबत मात्र गप्प आहेत. शेकापने आपलं संघटन घट्ट केलं, उमेदवारी जाहीर केली, तर दळवी मात्र शांत का? हा प्रश्न आता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात धगधगत आहे. शिवसेना शिंदे गटाचे अलिबागमधलं संघटन गोंधळलेलं दिसतंय. नेतृत्वाचा अभाव, स्थानिक पातळीवर समन्वय नसल्याने कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे.दळवींच्या सोयरिकीच्या राजकारणामुळे शेकापला मोकळं मैदान मिळालं,अशी चर्चा आता कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत. आमदारांनी शेकापच्या नेत्यांशी सलगी ठेवलीय का? असा सवाल स्थानिक पातळीवर विचारला जातोय. अलिबाग नगरपालिकेत शेकापचं वर्चस्व वाढत चाललं आहे. विरोधक फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत.शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणतात,नेतृत्वाकडून दिशा नाही, आदेश नाही, प्रचार नाही… मग आम्ही लढायचं कसं?अलिबागच्या नागरिकांनाही आता हे उघडपणे जाणवू लागलं आहे …महेंद्र दळवींच्या दुर्लक्षामुळे शिवसेना शिंदे गटाची शक्ती कमी झाली आहे.शेकापने जमिनीवर काम केलं, मतदारांशी थेट संवाद साधला, तर दळवी मात्र निवडणुकीच्या राजकारणात अनुपस्थितच…तटकरेंवर भाषणातून घणाघाती हल्ले करणारे महेंद्र दळवी अलिबाग नगरपालिकेच्या रणांगणात का उतरले नाहीत?अलिबागमध्ये शेकापचा झेंडा फडकतोय, आणि दळवींची शिवसेना गप्प बसलीय…हा मौनप्रपंच फक्त विरोधकांच्या फायद्याचा ठरणार आहे का?याचं उत्तर आता अलिबागच्या जनतेलाच द्यावं लागणार आहे!