प्रेमळ मातृस्वरूप हरपले; चव्हाण परिवारावर शोककळा…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता सुसगाव, पुणे येथे राहत्या घरी कै. शांताबाई हरीचंद्र चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. अत्यंत शांत, सुस्वभावी आणि प्रेमळ मातृस्वरूप हरपल्याने संपूर्ण चव्हाण परिवारावर शोककळा पसरली आहे. कर्तृत्व, प्रेम, संस्कार आणि त्यागाची ओळख असणारी ही माता आज अनंतात विलीन झाली असून समाजातही अपरिमित पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने चव्हाण घरावर जणू दु:खाचे सावट पसरले आहे.

कै. शांताबाई यांच्या पश्चात तीन मुले राजेंद्र चव्हाण (राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र, पुणे  येते सुप्रीटेंडन्ट ऑफिसर), महेंद्र चव्हाण (मराठवाडा महाविद्यालय, पुणे येते प्राध्यापक) आणि रवींद्र हरीचंद्र चव्हाण (महाड येथील शिक्षणसंस्था चालक व राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष,रायगड जिल्हाध्यक्ष) तसेच तीन सुना व सात नातवंडे असा मोठा परिवार आहे.  या दरम्यान आई गेल्याने घरातील देव्हारा जणू रिकामा झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रेमळ सहवासाने उमललेले घर आज ममताशून्य झाले असून मातृप्रेमाचा, ऊर्जेचा आणि मार्गदर्शनाचा आधार हरविल्याने परिवार व जिवलगांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आहेत.

कै. शांताबाईंच्या निधनाने गावकुस, समाज आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. साधा, प्रेमळ पण कणखर स्वभाव, माणुसकीचे मूल्य, त्याग आणि संस्कारांचे मार्गदर्शन अशा अनेक सकारात्मक ठेव्यांची आठवण सर्वांच्या मनात कायम राहील. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने पुढे येऊन माननीय रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण चव्हाण परिवाराला मनःपूर्वक सांत्वना व्यक्त करत दु:खात सहभागी झाले. ममतेचा हा सृष्टिदात्री दीप आज अनंत प्रवासाला निघून गेला आहे. आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.