रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काळात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धक्का दिलाय.श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायत मधील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत आणि एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत, मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.ऐन निवडणुकीत झालेल्या या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा सुरुंग लागलाय.
महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना धक्का म्हणावं लागेल…

