रायगडात महायुतीत राजकीय भूकंप…भाजपचा राजकीय स्फोट… शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट धक्क्यात…

0
4

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यात अभूतपूर्व राजकीय भूकंप झाला.अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चांचे सर्व समिकरण एका क्षणात उलटवत भाजपाने महायुतीतील कोणत्याही सहयोगी पक्षाला एका जागेचीही उसनवारी न देता सर्व २१ नगरसेवक पदांसह नगराध्यक्षपदासाठी स्वतःचे उमेदवार उभे केले.शोभा शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत भाजपाने “स्वबळावर लढा” हा कडक संदेश आपल्या मित्रपक्षांनाच दिला आहे.

भाजपाच्या या भूमिकेने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अक्षरशः गोंधळून गेले.बराच काळ महायुतीत “दुर्लक्षित” केल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गट आक्रमक मोडमध्ये गेला.आणि नगराध्यक्षपदासाठी रुपाली ठाकूर यांचा अर्ज दाखल करून स्वबळावर निवडणुकीची अधिकृत घोषणा केली.दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाने या गोंधळानंतर थेट निवडणुकीपासून दुरावण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी भावना घाणेकर यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस व उबाठा शिवसेना गटाने संयुक्तपणे सर्व २१ नगरसेवकांसाठी अर्ज दाखल केले आहेत. राखीव नगराध्यक्षपदामुळे तिन्ही मोर्चांत “योग्य उमेदवार” शोधण्याचा तुफान पेच निर्माण झाला होता. पण भाजपाच्या एकतर्फी निर्णयाने संपूर्ण राजकीय चर्चेत उलथापालथ केली.

अंतिम दिवशी एकूण ८७ अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठी ९ दावेदार उभे राहिले आहेत. मात्र प्रत्यक्ष लढत भाजप, महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट या तीन गटांमध्येच तिखट होणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.काही उमेदवारांनी अनेक अर्ज भरले असल्याने अंतिम चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी उलगडेल.

ताज्या घडामोडींनंतर उरणची नगरपालिका निवडणूक तिरंगी संघर्षात परिवर्तित झाली आहे.भाजपाचा सोलो फाइ”, महाविकास आघाडीची संयुक्त ताकद आणि शिवसेना शिंदे गटाचा बंडखोर स्वबळाचा मोर्चा या तिन्हींच्या तुफानी चुरशीमुळे उरणमधील तापमान चरमसीमेला पोहोचले असून पुढील काही दिवसांत राजकीय नाट्य आणखी रंगणार हे निश्चित!