पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण…

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटल मध्ये डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात पूर्ण केल्या आहेत. पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्र मधला पहिला हॉस्पिटल झाला आहे. सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे.
रोबोट सर्जरी मध्ये लोकांचा फायदा असा होतो की स्नायू न कापता आणि लिगामेंट ना कापता गुडघ्याचं ऑपरेशन (नी रिप्लेसमेंट) करता येतो. शस्त्रक्रिया करताना रोजा रोबोट 0.5 मिलिमीटर आणि 0.5 डिग्री परफेक्शननी ऑपरेशन करू शकतो. ज्याचा फायदा रुग्णाला होतो. ज्यामुळे रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो. रुग्णाचा पाय खूप जास्त वाकतो. हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावा लागतो. रुग्ण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातो तेव्हा तो चालत घरी जातो. आणि घरी सुद्धा पंधरा-वीस दिवसांनी लवकरच नॉर्मल लाईफ मध्ये येऊन जातो. याला इंजेक्शन कमी लागतात. गोळ्या कमी लागतात. हॉस्पिटलमध्ये कमी दिवस द्यावा लागतात. या रोबोट सर्जरीत वयाची समस्या नाही, शस्त्रक्रिया 35 वर्षाच्या माणसांमध्ये पण करू शकतो आणि पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट शस्त्रक्रिया 93 वर्षाच्या रुग्णामध्ये सुद्धा केला आहे.
ही शस्त्रक्रिया 70, 80, 90 किलोमध्ये पण करू शकतो आणि 120 ते 140 किलो वजनाच्या रुग्णावर पटेल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया खूपच कॉमन झाला आहे. पटेल हॉस्पिटल मध्ये पनवेलमधील ग्रामीण विभागातून रुग्ण गुडघ्याच्या रोबोटिक सर्जरीसाठी आले आहेत. रुग्णालयात रोबोटिक सर्जरीसाठी पेण, रायगड, थला, मंडणगड, म्हसळा, सांगली, सांगोला, विटा, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, युपी, बिहार, दुबई आणि बांगलादेशहुन रुग्ण आले आहेत. शस्त्रक्रिया झालेले सगळेच रुग्ण प्रसन्न आहेत. कारण याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत. ही शस्त्रक्रिया सामान्य माणसाला सुद्धा परवडते. कारण ही शस्त्रक्रिया इन्शुरन्स मध्ये पण कव्हर होतो आणि सामान्य माणसाला जे नॉर्मल गुडघ्याची प्रत्यारोपण आहे तेवढेच पैसे घेत असून  रोबोटचे वेगळे एक्स्ट्रा पैसे चार्ज करत नसल्याचे डॉक्टर कुणाल माखिजा यांनी सांगितले.