‘अल्फा अवॉर्ड्स २०२५’ : प्रेरणा, गौरव आणि मानवतेचा भव्य उत्सव मुंबईत साकार…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

मुंबईत प्रतिष्ठेचे ‘अल्फा अवॉर्ड्स २०२५’ प्राभादेवी, दादर (प) येथील रविंद्र नाट्य मंदिरात मंगळवार दि. १८ नोव्हेंबर रोजी मोठ्या जल्लोषात आणि उच्च दर्जाच्या परंपरेला शोभेल अशा वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र पाल, आरपीआयचे राष्ट्रीय महासचिव व अल्फा कम्युनिकेशन्सचे चेअरमन डॉ. राजेंद्र गवई, दि फ्री प्रेस जर्नलचे अध्यक्ष अभिषेक कर्णानी आणि लॉरेन्स अँड मेयोचे मार्केटिंग अध्यक्ष डॉ. विवेक मेंडोन्सा अशा मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्कृष्ट उंची मिळाली. आगमनानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ सह स्वागत करण्यात आले. त्या नंतर मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यानी चहा आणि स्नॅक्सने चा आनंद घेतले. लॉरेन्स अँड मेयो या १८७७ पासून कार्यरत प्रतिष्ठित चष्मा ब्रँडच्या मुख्य प्रायोजकत्वाखाली या कार्यक्रमाची भव्य सुरुवात स्वागत, दीपप्रज्वलन, पाहुण्यांचा परिचय, त्यांचे भाषण आणि सुरेल कलाविष्कारांनी झाली.

कार्यक्रमातील दोन प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या कामाचा प्रवास ऐकून संपूर्ण सभागृह भावूक झाले. व्हीलचेअरवर आलेल्या मिसेस केतना मेहता आणि लाकडी आधाराने उभ्या राहिलेल्या मिसेस गीता कॅस्टेलिनो त्यांनी केलेल्या कामामुळे मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला स्वतः मंचावरून खाली उतरून त्यांच्या जागी गेले आणि त्यांना सन्मानित केले. या क्षणी उपस्थित सर्व प्रेक्षक उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम करत होते, ज्यामुळे या सोहळ्याचा मानवी मूल्यांना वाहिलेला आदर अधिकच अधोरेखित झाला. उत्कृष्ट उन्नत प्रगत व्यवस्थापन उदा. एक बटण क्लिक खुर्च्या असूनही त्याबरोबरच सर्व व्यक्तींचा समान सन्मान व्हावा यासाठी तंत्रज्ञानाच्या विकासावर रविंद्र नाट्य मंदिराने विचार करायलाच हवा.

सोहळ्यादरम्यान “THE SPARK WITHIN – True Stories of Ordinary People Igniting Extraordinary Social Change” या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक – सुष्मीता बी. बुबना, स्वेतलाना पिंटो, डॉ. अनिल के. लुनिया, रुषभ तुराखिया, कॅरोन शैवा आणि नीलम काबरा लाहोटी शिवाय या पुस्तकाचेप्रकाशक अमित सूरी (TWAGAA) यांनी आकार दिला त्यांचे सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, देशभरातून आलेल्या तब्बल १२५ नामांकनांमधून परीक्षक मंडळाने ज्या मध्ये डॉ. रवींद्र गवई, डॉ. विवेक मेंडोनसा, सौ. रूपा नाईक, प्रॉ. चंद्रिका परमार, श्री. सुदर्शन सूची आणि कॅरोन शैवा यांनी केलेल्या काटेकोर परीक्षणानंतर सुमारे 29 निवडलेले विजेते एक्सलन्स अवॉर्ड, इम्पॅक्ट अवॉर्ड आणि चेंजमेकर अवॉर्ड या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी श्रेणींमध्ये गौरविण्यात आले, ज्यातून उत्कृष्ट कार्य, सकारात्मक बदल आणि सामाजिक योगदानाचा उत्सव साजरा झाला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थितांना नवचैतन्य दिले, तर विजेत्यांच्या भव्य फोटो सेशननंतर राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. सर्व कार्यक्रमानंतर पाहुण्यांची आदरातिथ्यपूर्ण व्यवस्था करत समारोपाला सर्वांना स्वादिष्ट जेवन देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन लॉरेन्स अँड मेयोच्या टीमने अत्यंत काटेकोरपणे केले आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी मिसेस मेंडोन्सा यांनी हेमा गणाचारी आणि नीलम काबरा लाहोटी, आयडोब्रो इम्पॅक्ट सोल्युशन्स बरोबर प्रभावी, मोहक आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीत पार पाडली. देशभरातून आलेल्या “प्रेरणादायी”, “उत्साहवर्धक” अशा अनेक प्रतिक्रिया या सोहळ्याने प्रत्येक विजेत्याला दिलेल्या नवउमेद आणि उर्जेची साक्ष देत होत्या.

या भव्य सोहळ्याची एकूणच झलक पाहता ‘अल्फा अवॉर्ड्स २०२५’ हे केवळ सन्मानांचे व्यासपीठ नव्हते, तर संपूर्ण देशाला प्रेरणेचा नवा संदेश देणारे सांस्कृतिक पर्व ठरले. सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्ती—मान्यवर, विजेते, आयोजक आणि प्रेक्षक—यांच्या चेहऱ्यावर समाधान, उत्साह आणि अभिमान यांचे अनोखे मिश्रण चमकत होते. कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाला एक नव्या ऊर्जा, सकारात्मकता आणि सौंदर्याची झळाळी लाभत गेली. उत्कृष्ट व्यवस्थापन, वेळेचे अनुशासन, भव्य सादरीकरण, प्रेक्षकांचा अनुशासित भाव, छायाचित्रकारांची क्षणोक्षणी सजग नजर आणि प्रत्येक विजेत्याच्या डोळ्यांतील चमक… या सगळ्यांनी एकत्र येऊन या सोहळ्याला एक ‘उत्कृष्टतेचा आदर्श नमुना’ बनवले. सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कथा, त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी गाठलेली उंची पाहून अनेकांना नव्या ध्येयांनी प्रेरित करणारा हा अविस्मरणीय अनुभव ठरला. “अल्फा अवॉर्ड्स” ची परंपरा यापुढेही असेच तेजाने उजळत राहील, अशी भावना उपस्थित प्रत्येकाच्या मनात दृढ झाली.