रायगडात राजकीय भडका! तटकरे–दळवी संघर्षात आता घोसाळकरांची धडाकेबाज एन्ट्री… तटकरे–दळवी वाद चिघळला; घोसाळकरांचा अनिकेत तटकरेंना जशास तसं पलटवार…

0
1

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून तटकरे–दळवी यांच्यात सुरू असलेल्या वादात आता शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांची धडक एन्ट्री झाली आहे. अनिकेत तटकरेंनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांवर घोसाळकरांनी तिखट, जशास तसं प्रत्युत्तर देत वातावरण आणखी तापवले.तटकरे–घोसाळकर यांच्यात प्रखर शाब्दिक चकमक रंगली असून, राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर करण्यात आलेल्या “चिटर” आरोपांना घोसाळकरांनी थेट पलटवार केला आहे. “दळवींना तुम्हीच तीन वेळा फसवलं, आम्ही नाही,” असा घणाघाती दावा घोसाळकरांनी केला. या सर्व घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय तापमान आणखी वाढले असून, महायुतीतील तणाव खुल्या संघर्षात परिवर्तित होत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.