महाडमध्ये गोगावले समर्थक आणि तटकरे समर्थकांमध्ये राडा… महाड पालिका निवडणुकीत शिंदे गट-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले…

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान,शिवसेना (शिंदे गट) नेते तथा मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे यांचे समर्थक यांच्यात मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे.या हाणामारीत गोगावले समर्थकांकडून तटकरे समर्थक सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून,त्यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.महाड नगरपालिकेच्या  निवडणुकीच्या निमित्ताने जाबरे मतदान केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाला.या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात बोगस व्होटिंग झाल्याचा आरोपही परस्पर विरोधी गट एकमेकांवर करत आहेत.एकूणच,महाडमध्ये झालेल्या या राजकीय राड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.