नरेंद्र मोदींच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चा ?… RSS च्या संकेतानंतर चर्चांना ऊत;फडणवीसांचे ‘केंद्रात जाणे’ म्हणजे पंतप्रधानपदाचे पहिले पाऊल?…

0
2

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

देशाच्या राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या संकेतांमुळे (RSS कडून मिळालेल्या माहितीनुसार) पुढचा उत्तराधिकारी कोण, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी असल्यामुळे,७५ वर्षांपासून देशाच्या सर्वोच्च पदाची आस लावून बसलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, फडणवीसांचा हा मार्ग सोपा नाही;त्यांच्यासमोर अनेक राष्ट्रीय नेते आणि मोठी आव्हाने उभी आहेत.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली ‘केंद्रात जाण्या’बद्दलची वक्तव्ये आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) दिलेल्या स्पष्ट संकेतांमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील एका अभ्यासू, धोरणी आणि कार्यक्षम नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर मोठी संधी मिळणार का, यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवणे हे फडणवीसांसाठी कोणत्याही ‘राजकीय गिर्यारोहणा’पेक्षा कमी नाही. या शर्यतीत त्यांना टक्कर देणारे बडे नेते खालीलप्रमाणे आहेत:

योगी आदित्यनाथ: उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कट्टर हिंदूत्ववादी चेहरा म्हणून त्यांची राष्ट्रीय प्रतिमा सर्वात मोठी आहे.

अमित शहा: भाजप संघटनेवर आणि केंद्राच्या धोरणांवर मजबूत पकड असलेले शहा, आजही मोदींच्या सर्वात जवळचे मानले जातात.

नितीन गडकरी: केंद्रात केलेल्या उत्तम कामामुळे आणि विरोधी पक्षांमध्येही स्वीकारार्हता असल्यामुळे ते एक मजबूत दावेदार आहेत.त्यांना फक्त महाराष्ट्राचा नाही, तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून आपली प्रतिमा सिद्ध करावी लागेल. केंद्रात किंवा अन्य मोठ्या राज्यांमध्ये प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचा अनुभव त्यांना मदतीला आणावा लागेल… अंतिम निर्णय हा नेतृत्वाचा असेल, त्यामुळे ‘उत्तराधिकारी’ म्हणून त्यांना नेतृत्वाचा अटळ विश्वास संपादन करावा लागेल.त्यांना इतक्या मोठ्या आणि तगड्या स्पर्धकांना मागे टाकून ‘अपरिहार्य नेता’ म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागेल.महाराष्ट्राच्या राजकारणाला ७५ वर्षांनंतर पंतप्रधानपदाची आशा पुन्हा एकदा जोरदार मिळाली आहे. फडणवीस या स्पर्धेत टिकून राहतात की, हे स्वप्न पुन्हा एकदा ‘आशा’च राहते, हे लवकरच स्पष्ट होईल!