महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांचे विमान दुर्घटना मध्ये बुधवारी निधन झाले असून गुरुवारी सकाळी 12 वाजता विद्या प्रतिष्ठान च्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर महाड शहर व तालुका पत्रकार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेक पत्रकार यांनी स्व अजित पवार यांच्या बदल आपल्या भावना व्यक्त करत पत्रकार व स्व अजित पवार यांचे नाते बाबत विचार मंथन केले अजित पवार यांचे वेळेचं बंधन ,सडेतोड भूमिका ही महत्व पूर्ण असल्याचे मत व्यक्त केले वेळेचे बंधन पाळणे हीच खरंच श्रद्धांजली असे मत पत्रकार यांनी व्यक्त केले या वेळी तहसीलदार महेश शितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे रमेश तडवी ,तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधव सह पोलीस कर्मचारी ,महाड नगरीचे उपाध्यक्ष संदीप जाधव , शिवसेना चे विकास गोगावले , सह महाड चे पत्रकार ,महिला पत्रकार उपस्थित होते

