महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड शहरातील तांबट आळीमधील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुयश सुनील नगरकर या विद्यार्थ्याने घरातील वडिलांच्या शिकारीच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये उघडकीस आला आहे…
महाड शहरांमधील तांबट आळीमधील सुनील नगरकर यांचा दहावीत शिकणारा सुयश नगरकर या मुलाने घरातील शिकारीची बंदूक घेऊन डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली…त्यामध्ये सुयश नगरकर हा जागीच मृत पावल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे..
तांबट आळीमध्ये राहणारे सुनील नगरकर यांनी शिकारीसाठी बंदुकीचा परवाना घेतला होता.. घरामध्ये असणारी बंदुकीची कल्पना त्यांच्या दहावी शिकणाऱ्या सुयशला पूर्वीपासूनच होती… मात्र आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याच बंदुकीचा चाप ओढून डोक्यात गोळी घालून घेण्याचा प्रकार सुयश नगरकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केल्याने याबाबत तांबट आणि परिसरात व महाडमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे…याबाबत महाड शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे…