रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):-
सोमवार दि, 12 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भातील आढावा बैठक प्रशासकिय भवन कर्जत येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा मुख्य उद्देश शासकीय योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचविणे व त्याचा सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे…या आढावा बैठकीच्या निमित्ताने योजनेच्या माध्यमातून नवीन युवकांना प्रशिक्षण देणे आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनांचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच युवकांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन त्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत…सदर कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूरचे प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार डॉ. शितल रसाळ, गटविकास अधिकारी,चंद्रकांत साबळे, संदीप कराड यांसह आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.