ब्रेकिंग न्यूज…यशश्रीचा मोबाईल दाऊदनेच लपवला होता… रेल्वे ट्रॅकच्या बाजूला टॉवरखाली सापडला मोबाईल…

0
146

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-

उरण हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली असून यशश्री शिंदेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा लपवलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे…रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका टॉवरखाली हा मोबाईल लपवण्यात आला होता… पण पावसात भिजल्याने तो सुरू होत नाही. त्यामुळे पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवला आहे… हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुध्दा पोलिसांनी हस्तगत केला आहे… गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत होणार आहे… गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखने  दिली आहे. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदने कबुली दिल्यानंतरही बक्कळ पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणे आता आणखी सोपे होणार आहे…