कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळ ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर व्हावे यासाठी सह्यांची मोहीम हुतात्मा स्मारक समिती नेरळ या द्वारे राबविण्यात आली. मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ गावात प्रचंड नागरीकरण सुरू आहे…त्यामुळे शहरीकरण कडे झुकलेल्या नेरळ ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर व्हावे यासाठी नेरळ ग्रामस्थांनी एक सही… नेरळ नगर परिषदसाठी अशी मोहीम हाती घेतली आहे…या मोहिमेसाठी आज १५ ऑगस्ट रोजी नेरळ गावात बहुसंख्य भागात टेबल लावून सह्या घेण्यात आल्या. ही चळवळ हाती घेणाऱ्या तरुणांनी घरोघरी जावून देखील सह्या घेतल्या. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोहिमेला सुरुवात झाली आणि बहूसंख्य नागरिकांची तेथे सह्या करण्यासाठी झुंबड उडाली होती.
दिवसभर नेरळ गावात चावडी नाका, हुतात्मा भाई कोतवाल चौक स्टेशन परिसर, हुतात्मा हिराजी पाटील चौक अंबिका भुवन नाका, माऊली मेडिकल, पाडा(वैभव ठाकूर यांचे कुरियर कार्यालय), राजबाग गेट, गणेश मंदिर, हेटकर आळी,चिंच आळी, दत्त मंदिर,पायरमाल, पाण्याच्या टाकीजवळ,मोहाची वाडी, साईबाबा चौक ,वाल्मिकी नगर,नेरळ पोलीस ठाणे जेनी ट्युलिप शाळा, खांडा-हनुमान मंदिर, ब्राह्मण आळी, श्रावण धारा बिल्डिंग, राजेंद्र गुरूनगर, संस्कार बिल्डिंग जवळ, राजेंद्रगुरूनगर, गणपती सभा मंडप, कुंभारआळी, गोरा कुंभार चौक, जुनी बाजारपेठ, अनिल जैन यांच्या दुकानाजवळ, सम्राट नगर, समाज मंदिराजवळ, नेरळ पूर्व, जयदीप क्रीडा मंडळ सभागृह, नेरळ पूर्व गंगानगर आणि युवराज सोसायटी, मातोश्री नगर, जुमापट्टटी, आदिवासी वाड्या आनंद वाडी शाळा मैदान येथे सह्यांची मोहीम राबविण्यासाठी टेबल लावले होते… नेरळ ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर व्हावे यासाठी हजारो नेरळकर यांनी सहयांच्या मोहिमेत सहभाग घेतला.या सह्यांची सर्व कागदपत्रे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मावळ चे खासदार श्रीरंग बारणे आणि कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे तसेच राज्य निवडणूक आयोग, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे.