माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) –
गेल्या अनेक दिवसांपासून माणगाव शहरात वारंवार वीज खंडीत होत आहे… वीज का खंडीत होत आहे?
हे जाणून घेण्यासाठी महावितरणशी संपर्क साधला असता… विद्युत पोलवर वेलीं ची वाढ झाल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण पडून ट्रीपर उडत असल्याचे अजब उत्तर देण्यात आले…
याबाबत अधिक माहिती अशी आहे की गेल्या अनेक दिवसांपासून माणगाव शहर आणि तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत… पावसाने १०-१२ दिवसांपासून विश्रांती घेतल्याने तापमानात जवळजवळ २७ ते ३२ सेलसियस डीग्री पर्यंत वाढ होत असल्याने तीव्र उष्णता व उकाडा जाणवत आहे… दि. १७ रोजी सकाळपासुन दुपारपर्यंत वारंवार वीज गायब होत होती… महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क केला असता… असे समजले की… गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने वेलीं ची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक विद्युत पोलवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे… वेली तसेच अर्थिंग प्रवाहामुळे विद्युत तारेवर ताण पडून ट्रीपर उडत आहे… परिणामी विज खंडीत होत आहे… वेलींचे प्रमाण मोठे असल्याने विद्युत पुरवठा खंडीत करुन वेली हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे…