चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):
खालापूर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी खालापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केले… सन २०२३/२४ या वर्षाच्या महसूल पंधरवडा २०२४ अंतर्गत १५ ऑगस्ट २०२४ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी,कर्मचारी – अधिकारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, उत्कृष्ठ कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार जितेन्द्र इंगळे यांनी सत्कार केला… त्याचबरोबर महसूल पंधरवडा सांगता समारंभ देखिल संपन्न झाला.नायब तहसीलदार विकास पवार, निवडणुक नायब तहसीलदार दशरथ भोईर, मंडळ अधिकारी भरत सावंत, मंडळ अधिकारी संदेश पानसरे, अव्वल कारकून अशोक सुसलादे,लेखनिक सारंग राठोड,अविनाश गुरले, अमोल वाघ, तलाठी माधव कावरखे, मुगदण,कोतवाल रुपाली निधी यांचा सन्मान करण्यात आला.यात सारंग राठोड हे गेली आठ वर्ष वेगवेगळ्या तालुक्यातून दरवर्षी सन्मान घेत असुन गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनीही जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला… तहसीलदार जितेंद्र इंगळे, अपर तहसीलदार पूनम कदम,निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड,नायब तहसीलदार विकास पवार, नायब तहसीलदार मिलिंद तीरेकर,नायब तहसीलदार दशरथ भोईर यांच्यासह मंडळ अधिकारी,अव्वल कारकून,तलाठी,महसूल सहाय्यक, कोतवाल व शिपाई, सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते…