Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडकेगाव दांडा... नियमबाह्य हॉटेलचे रात्रीच्या अंधारात काम पत्रकारांची तहसीलदारांकडे तक्रार, म्हणून रात्री...

केगाव दांडा… नियमबाह्य हॉटेलचे रात्रीच्या अंधारात काम पत्रकारांची तहसीलदारांकडे तक्रार, म्हणून रात्री होतेय काम 

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर): 

 उरण तालुक्यात सी.आर.झेड. कायद्याची मोठ्या प्रमाणात  मोडतोड केली जात आहे… ही मोडतोड करण्याचे धाडस प्रशासनाची टेबलाखालून साथ असल्याने होत आहे… याविरोधात अनेक तक्रारी करूनही उरण तहसील कार्यालयाने दखल घेतली नव्हती… शेवटी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली…  त्यानंतर प्रशासन हादरले… उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी बुधवार दि. १४ ऑगस्ट रोजी उरण तालुका मराठी पत्रकार संघाशी तातडीची बैठक घेऊन केगाव दांडा येथील सीआरझेडचे उल्लंघन करून सुरु असलेल्या नियमबाह्य हॉटेलच्या बांधकामावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले… त्यामुळे उरण तालुका मराठी  पत्रकार संघाने आपले १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारे  उपोषण-निदर्शने आंदोलन स्थगित केले… पत्रकारांच्या दबावामुळे आपल्यावर कारवाई होईल म्हणून  नियमबाह्य हॉटेलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न संबंधितांचे आहेत… या नियमबाह्य हॉटेलच्या बांधकामाला तहसील प्रशासनातील काही लोकांची टेबलाखालून साथ आहे… त्यामुळे शनिवार व रविवार शासकीय सुट्टी धरून रात्रीच्या अंधारात हॉटेलसदृश्य सुमारे शंभर खोल्यांच्या इमारतीचे काम सुरु आहे… लाईटच्या उजेडात हे प्रताप केले जात आहेत…         केगाव दांडा परिसरात कांदळवनांवर मोठ्या प्रमाणात समुद्र भरती रेषेला लागून या हॉटेलचा भराव आहे. गुरचरणाच्या जागेवर ही भली मोठी हॉटेलसदृश्य सुमारे शंभर खोल्यांची इमारत बांधली जात आहे… मात्र त्यावर कारवाई केली जात नाहीय… सीआरझेडचे उल्लंघन होऊनही उरण तहसील प्रशासन शांत आहे… आता तर रात्रीच्या अंधारात काम केले जात आहे… उरण तहसीलदारांनी आपली केबिन सोडून या बांधकामाची जागेवर जाऊन पाहणी करावी… अशी पत्रकारांची मागणी आहे… उरण तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हाधिकाऱ्यांकडेही याप्रकरणी दाद मागणार आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments