Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमुंबई-गोवा महामार्गासाठी प्रथम उपोषण नंतर बंद... जन आक्रोश समितीचे पाच दिवस आंदोलन...

मुंबई-गोवा महामार्गासाठी प्रथम उपोषण नंतर बंद… जन आक्रोश समितीचे पाच दिवस आंदोलन…

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):

जन आक्रोश आंदोलन समितीने गेले ५ दिवस मुंबई-गोवा महामार्गासाठी उपोषण केले… या उपोषणाला पाठिंबा म्हणून माणगाव व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद ठेऊन सोमवार दी.१९ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला…  हा बंद १००% यशस्वी झाला… दुपारी १२ च्या दरम्यान मोठ्या संख्येने माणगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा दळवी यांच्या प्रमूख उपस्थितीत व्यापारी बांधवांनी उपोषण स्थळी येवून उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला…  संजयअण्णा साबळे, मावळा प्रतिष्ठान, श्री. राम नवमी उत्सव समिती, रिक्षा युनियन, ज्येष्ठ नागरीक संघ तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक, मंडळ, संस्था यांचाही बंद आणि उपोषणाला पाठिंबा होता… दरम्यान उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले…   सदर आंदोलन माणगावचे लोकप्रिय नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, संजय अण्णा साबळे, लक्ष्मण   बाळा दळवी, रायगड जिल्हा कोकण जन आक्रोश आंदोलन अध्यक्ष संतोष रणपिसे सर, समन्वयक संजोग मानकर, माणगाव तालुका अध्यक्ष डॉ. इरफान अंतुले, सचिव रमेश भाई ढेबे, सक्रिय कार्यकर्ते सुधिर सापळे यांच्यासह सदस्यांमुळे यशस्वी झाले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments