Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रपनवेल विधानसभा मतदारसंघावर उबाठा शिवसेनेचा दावा...   उरण नंतर आता पनवेलमध्ये शिवसेनेच्या विरोधात...

पनवेल विधानसभा मतदारसंघावर उबाठा शिवसेनेचा दावा…   उरण नंतर आता पनवेलमध्ये शिवसेनेच्या विरोधात बातम्यांची पेरणी …

शिवसत्ता टाइम्स पनवेल (वार्ताहर) :-

पनवेल विधानसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा केला आहे… येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांना चांगले वातावरण असून तेच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा पराभव करू शकतात… या मतदारसंघावर शेकाप जरी दावा करीत असला तरी सध्या शेकाप महाविकास आघाडीत आहे… यापूर्वी स्वतत्रंपणे लढताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शेकापचा दणदणीत मतांनी पराभव झालेला आहे… त्यामुळे  भाजपा  आमदार प्रशांत ठाकूर यांचा पराभव शिरीषदादा घरतच करू शकतात कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघात कमालीची सहानुभूतीची लाट आहे… शिवाय मुस्लीम आणि दलित बांधव मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत आहेत… लोकसभेलाही शिवसेनेने या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळविले … म्हणून शिवसेनेकडून या  पनवेल विधानसभा मतदारसंघावर दावा होत आहे… शिरीषदादा घरत यांनी मतदारसंघात बैठकांचा सिलसिला सुरू केला असून त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे… भावी आमदार म्हणून त्यांचे गावोगावी स्वागत होताना दिसत आहे… मात्र  शिरीषदादांची ही वाढती लोकप्रियता कोणाला तरी जोरदारपणे खुपत आहे… यातून राजकीय पोटदुखी सुरु झाली असून … उरणप्रमाणेच आता पनवेलमध्ये शिवसेनेच्या विरोधात बातम्यांची पेरणी सुरु झाली आहे… या विरोधातील बातम्यांनी शिवसैनिक संतप्त असून कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत आहे आणि कायम ठरणारही आहे… असे बोलत आहेत…  शिरीषदादा आमदार झाल्यास पनवेलमध्ये नुकसान कोणाचे ? यावर बोलताना शिवसैनिक म्हणत आहेत की… नुकसान कोणाचेही होवो…व्यक्तीगत नुकसानाची आम्हाला पर्वा नाही… आम्हाला पनवेलमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिरीषदादा आमदार म्हणून  पाहिजेत …  शेवटी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो… जे जे  शिरीषदादांच्या विरोधात  समोर येतील त्यांना शिवसैनिक आडवे करतील… आता एकच वादा… आमचे भावी आमदार शिरीषदादा…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments