रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे…घटनेच्या निषेधार्ह शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले…राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले … त्यानुसार पनवेल,उरण आणि खालापूर तालुक्यासह खोपोलीत भर पावसातही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून हे निषेध आंदोलन करण्यात आले…रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कामोठे, खांदाकॉलनी, नवीन पनवेल, पनवेल व कळंबोली शहरात काळ्या फिती तोंडाला बांधून आणि काळे झेंडे घेऊन रस्त्यावर निषेध आंदोलन झाले…यावेळी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी , युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… तर उरण शहरात महात्मा गांधी चौक येथे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला… उरणमधील आंदोलनात मनोहरशेठ भोईर यांच्यासह शेकापचे प्रीतम म्हात्रे,काँग्रेसचे बबन कांबळे,राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर,बहुजन मुक्ती पार्टीचे संतोष घरत यांचा सहभाग होता…
खोपोली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन तोंडाला पट्टी बांधून महायुती सरकारचा तीव्र निषेध केला… त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन दिले.महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, कार्यकर्ते, महीला भगिनी उपस्थित होते. या आंदोलनावेळी शिवसैनिकांकडून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मिंधे सरकारचे करायचे काय?, आम्हाला नको लाडकी बहीण, आम्हाला हवी सुरक्षित बहीण, शिंदे सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या…