उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
उरणमध्ये शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री घडलेल्या हिट अँड रन… अपघाताची जोरदार चर्चा शहरासह नवी मुंबई,पनवेल परिसरात आहे… याबाबत उरण पोलिसांनी योग्य ती माहिती जाहीर करावी अशी मागणी उरणमधील जनतेसह पत्रकारांनी सोशल मीडियावर लावून धरली आहे… कारण या अपघाताबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत…सोशल मीडियावर एका अपघातग्रस्त गाडीचा फोटो व्हायरल झाला आहे…त्या गाडीवर इंडियन नेव्ही असे लिहिलेले असून या गाडीला व्हीआयपी नंबर असल्याचेही सोशल मीडियावर दिसत आहे.. उरणमधील हिट अँड रन प्रकरणी या गाडीचा संबंध आहे का ? असा सवालही होत असून योग्य ती माहिती प्रसारित करण्याचे आवाहन उरण पोलिसांना करण्यात येत आहे… सदर गाडी कोण चालवत होते… ?गाडी चालकाने नशापाणी केले होते काय ? एखादी तरुणी ही गाडी चालवीत होती काय ?गाडीत तरुणी आणि तिचा मित्र होता काय ?असे अनेक सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे आहेत…
उरण द्रोणागिरी नोडमधील देवकृपा चौकात २४ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली…अपघात होऊन कित्येक तास झाले तरी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने… पुन्हा एकदा उरणकरांनी मोर्चा काढायचा का ?असा सवाल होत आहे… कारण भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ५ दुचाकींना व नागरिकांना जोरदार धडक दिली असून या अपघातात ३ जण गंभीर जखमी आहेत…