बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात पेणमध्ये निषेध…पेणमध्ये हिंदू संघटनांनी काढली निषेध फेरी…

0
71

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्‍याचार होत आहेत…त्‍याचा निषेध करण्यासाठी पेणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली…शहरातील कोतवाल चौक ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत घोषणा देत संपूर्ण पेण शहरातून फेरी काढण्यात आली…निषेध रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित राहून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला…
या फेरीवेळी ‘बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला,हिंदूवरील अत्‍याचार सहन करणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्‍या…यावेळी पेण शहरात आणि नाक्यांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता…तसेच निषेध फेरीवेळी पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा सज्‍ज होता…
या निषेध फेरीमध्ये मंगल पाटील, ऍड.गणेश म्हात्रे, भास्कर पाटील, भोपतराव महाराज, महेश पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, अरुण भोईर, आदी नेत्यांसह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते…यावेळी प्रांत कार्यालय अधिकारी अरुण म्हात्रे यांना बांगलादेशातील होत असलेल्या अन्यायाबद्दल लेखी निवेदन सादर करण्यात आले…