बदलापूर घटनेच्या निषेधार्ह बहुजनसेनेचे आंदोलन…घटनेतील नराधमांना फाशी देण्याची शासनाकडे मागणी…

0
125

महाड शिवसत्ता टाइम्स(निलेश लोखंडे):-

बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपेशभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे दि.25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवर अत्याचार, खुनी, हत्याकांड निषेधार्ह बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षांच्या दोन चिमुकलिंवर आत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्ह  बहुजन सेनेने जन आक्रोश आंदोलन  करून जाहीर निषेध केला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा…प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा…अमानुष घटनेतील नराधमांना फाशी द्या अशी मागणी बहुजन सेनेने शासनाकडे केली आहे…या आंदोलनात बहुजन सेनेचे कार्यकर्ते, सदस्य व महिला वर्ग  मोठ्या संख्येने उपस्थित होते….