Friday, November 22, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडउद्धवसाहेबांचे सैनिक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला भिडले...  जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा,विष्णूभाई पाटील पोलिसांच्या ताब्यात...

उद्धवसाहेबांचे सैनिक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला भिडले…  जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा,विष्णूभाई पाटील पोलिसांच्या ताब्यात…

रायगड शिवसत्ता टाइम्स  (वार्ताहर ) :-

अवघ्या काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे…असे असताना भाजपा-शिंदे सरकारला  दुरावस्था झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का ?.. अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आणि संपर्कप्रमुख आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील यांनी निषेध आंदोलन केले…  सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी महामार्गावरील पेण वाशी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवण्यात आल्या…      यावेळी संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्यासमवेत शिवसेना प्रवक्ते धनंजय गुरव,विभागप्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील,जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, दर्शना जवके तसेच अलिबाग-पेण येथील पदाधिकारी उपस्थित होते…
गणपतीला चाकरमानी पंधरा दिवस आधीच कोकणात पोहचतात…काही चाकरमानी दुरावस्था झालेल्या महामार्गावरून कोकणात गेलेही…पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे…तेव्हा आधीपासून मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पहाणी का केली नाही ? आता रस्त्याची पाहणी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे… मुंबई-गोवा महामार्गावरील कामावरून महायुतीत वाजले आहे…रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याने मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उबाठा शिवसेनेने हाणला आहे…थोडे दिवस थांबा… निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावरच येणार आहेत… असेही शिवसेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments