Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींच्या हस्ते उदघाटन झालेला शिवरायांचा पुतळा कोसळला... नौदलदिनाच्या कार्यक्रमावेळी मालवणमध्ये उभारला होता पुतळा...

मोदींच्या हस्ते उदघाटन झालेला शिवरायांचा पुतळा कोसळला… नौदलदिनाच्या कार्यक्रमावेळी मालवणमध्ये उभारला होता पुतळा…

मालवण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यापूर्वी नौदलदिनाच्या  कार्यक्रमाच्या वेळी  उभारलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी कोसळला. सहा महिन्यापूर्वी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  राजकोट येथील या पुतळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी लाखो शिवप्रेमींनी भेटी देऊन या पुतळ्याचे दर्शन घेतले होते. मात्र आज हा पुतळा कोसळला असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी या पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे हा पुतळा  कोसळला असल्याचे सांगितले, व संबंधितांवर त्वरित एफ आर आय नोंदवून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अभेद्य लाटांशी सामना करत आजही सन्मानाने उभा आहे. मात्र सहा महिन्यापूर्वी मालवण राजकोट येथे अनावरण झालेला  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्याचा सामना करू शकला नाही. अशी भावना सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments