नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
विधानसभा निवडणुकीच्या: पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे….सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत…. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे…हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय…लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत…यामुळे भाजपच्या खासदाराचा पराभव झाल्याचे गणेश हाके म्हणाले… त्यामुळे अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे… खरे म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे असे हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणे देखीवल महत्वाचे ठरणार आहे… कारण मागील दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.सध्या अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केले का? असे म्हणत तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केला… पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?असा सवाल हाके यांनी केला… आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्ष अशोक केद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच अहमदपुरात विधानसभेसाठी शड्डू देखील ठोकला आहे…