Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडनवी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली... नवीमुंबई महानगरपलिकेचे मोरबे धरण ओव्हर फ्लो...

नवी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली… नवीमुंबई महानगरपलिकेचे मोरबे धरण ओव्हर फ्लो…

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील): 

स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले 450 दललि प्रतिदिन क्षमतेचं मोरबे धरण पूर्ण भरले असून शुक्रवारी आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे उपस्थित होते…मोरबे धरण क्षेत्रात यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असून अत्यंत कमी कालावधित म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण भरलेले आहे. या क्षेत्रात आजतागायत 3,374 मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटर इतकी भरलेली आहे. धरणात 191.463 द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज विसर्ग करण्यात आला. अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा, अशी मनोकामना करत जलपूजन संपन्न झाले… मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments