Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक... मुंबईत महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन...

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक… मुंबईत महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-    

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. ज्यानंतर सरकावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या…आता याच घटनेचा निषेध म्हणून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी या प्रकरणी आक्रमक झाली आहे. तुरुंगात टाकले तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे…शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत… छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान…त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसेच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या…या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत…. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन. शरद पवार म्हणाले की, पुतळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. ही बाब गंभीर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments