खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे ):-
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताची मालिका सुरु असतानाच रविवार दि.1 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे…रविवारी मध्यरात्री 2.35 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून टाटा टेम्पो क्रमांक KA – 25 – AB – 4212 वरील चालक संतोष शेटटी वय 27 वर्ष रा. धारवाड कर्नाटक याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुसऱ्या लेनवर चालणाऱ्या ट्रक क्रमांक MH10DT5199 ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.. जोरात धडक बसल्याने क्लिनर बाजूकडील टेम्पोची केबीन दबली गेली…व त्यातील क्लिनर गुरूसिददा वय अंदाजे 25 हा गंभीर दुखापत होवून जागीच मृत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे…. सदर अपघात हा खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला…
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय.आर.बी. पेट्रोलिंग, देवदूत, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स इत्यादी यंत्रणांनी घटनासथळी हजर होऊन मदत कार्य केले….