Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रते राजकरण नाही...गजकरण आहे...खाजवत बसले आहेत...महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट केल्याशिवाय राहू नका... 

ते राजकरण नाही…गजकरण आहे…खाजवत बसले आहेत…महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट केल्याशिवाय राहू नका… 

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात आज राज्यभर महाविकास आघाडीने आक्रोश केला. राज्यात ठिकाठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. त्यांनी या घटनेचा संताप व्यक्त केला. हे शिवद्रोही सरकार असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.महाराष्ट्रात जे वातावरण चालले आहे. त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहेत असा आरोप आहे. मी म्हणेल ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे.खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.  याप्रकरणात चुकीला माफी नाही, असे त्यांनी सरकारला ठणकावले. त्यामुळे महाविकास आघाडी आता याविषयीचे आंदोलन तीव्र करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आपल्या देशाचे प्रवेशद्वार.. इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे…त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट, असे उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हाला महाराष्ट्राने ठेवले नसते…माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का. माफी मागताना मग्रुरी कसली दाखवता असा घणाघात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. स्टेजवर मुख्यमंत्री बसले होते. सोबत दीड शहाणे, दोन शहाणे होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते माफी मागत असताना हे सर्वजण हसत असल्याचा गंभीर आरोप पण ठाकरे यांनी केला.दिल्लीच्या एअरपोर्टचे छत कोसळतेय, पूल कोसळतेय. कशाकशाची माफी मागणार. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही. करणार नाही. हे दाखवून देण्यासाठी जमलो आहोत. ही जाग आली आहे ती कायम ठेवा. या महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट केल्या शिवाय राहू नका, असा टोला त्यांनी हाणला….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments