गोरेगांव शिवसत्ता टाइम्स ( प्रसाद गोरेगावकर):-
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि शिवसेना कार्यकर्ते नागांव यांच्या सहकार्यातून नागांव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅगेचे वाटप करण्यात आले…कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले हे नेहमीच सर्वांना मदतीचा हात देतांना दिसत असतात. त्यांच्याकडे गेलेला एकही माणूस रिकाम्या हाताने कधीही परत येत नाही म्हणूनच भरतशेठ यांना गरीबांचा शेठ म्हणून ओळखले जाते. यावेळी देखील आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि शिवसैनिकांच्या सहकार्यातुन नागांव रा. जि. प. शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतिच्या स्कुल बॅगचे वाटप आज सकाळी ११.०० वाजता करण्यात आले.
या वाटपाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांसोबत लहान मुलांवरील वाढत्या अत्याचारांचे गुन्हे तसेच शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणखी काय उपायोजना करावी याबाबत चर्चा केली असता नागांव शाळेत CCTV तसेच संगणक प्रणालीची कमतरता असून आम्ही लवकरच भरतशेठ यांच्या माध्यमातून शाळेतील आमच्या मुलांच्या हिताची गरज देखील लवकरच पुर्ण करु असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
यावेळी महिला उपतालुका प्रमुख स्वाती करकरे, शाखा प्रमुख भुपेंद्र कासरेकर, शिक्षण समिती अध्यक्ष किरण ढेपे, माजी उपसरपंच राजेंद्र शिर्के, हरेश शिर्के, रमेश मोरे, ग्रा.सदस्य निवेश शिर्के, सिद्धि जाधव मुख्याध्यापिका आरती जाधव तसेच इतर शिक्षक व पालक उपस्थित होते…