Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडआगामी गणेशोत्सव व ईद मिलादून नबी सण एकत्र .... नेरळ पोलीस ठाण्यात...

आगामी गणेशोत्सव व ईद मिलादून नबी सण एकत्र …. नेरळ पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न….

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):

आगामी गणेशोत्सव व  ईद मिलादून नबी हे दोन्ही सण एकत्र येत असल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यात दिनांक २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता उप विभागीय पोलीस अधिकारी डी.डी.टेळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली… गणपती उत्सव आणि ईद मिलादून नबी   हे दोन सण एकत्र येत असल्यामुळे नेरळ परिसरात शांतात राखावी म्हणून दर वर्षीप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्यात या मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते …
या सभेमध्ये माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी वाहतुकीच्या समस्सेवर उपाय योजना करण्याचे सुचविले…  तर वकील सुमित साबळे यांनी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यावे याची मागणी केली …तर नितीन कांदळगावकर यांनी ज्या गाड्या रस्त्यावर कायम स्वरूपी उभ्या असतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली…
महावितरण व ग्रामपंचायत यांना विशेष सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले…  तसेच कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्था तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये व बिघडू नये म्हणून विशेष लक्ष द्यावे, अश्या सूचना देण्यात आल्या… नेरळ परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. कोठेही काही अनुचित झाले तर ते आपण  मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा पोलिसांना कळवले पाहिजे… पोलिसांना गणेशोत्सव म्हणजे वार्षिक पेपर सारखाच असतो त्यामुळे आम्ही नेहमीच सतर्क असतो, असे टेळे यांनी सांगितले… यावेळी सावळाराम जाधव, अंकुश दाभणे, आरीफ आ कादीर भाईजी, आयुब टीवाळे, सरफराज नजे, वकील सुमित साबळे, सुनील पारधी, नितीन कांदळगावर, संजय अभंगे, संतोष पेरणे, अजय गायकवाड, झमन पालटे, कमिल भाईजी अशे, गोरख शेप,अरविंद कटारिया, रोहिदास मोरे, सुनील पारधी उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments