Wednesday, September 18, 2024
Homeमहाराष्ट्रदिनेश तुरे,सेवाभावी समाज उभारणीचे दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित...

दिनेश तुरे,सेवाभावी समाज उभारणीचे दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित…

जोगेश्वरी शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):-

        महाराष्ट्रातील पत्रकारांची अग्रगण्य संघटना मुंबई वृत्तपत्र संघ यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी सोहळा मुंबई येथील फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉइंट दैनिक नवशक्तीच्या कार्यालयात पार पडला या प्रसंगी कामोठे पनवेल येथील पत्रकार – वृत्तपत्र लेखक  दिनेश  तुरे  यांना  वृत्तपत्र लेखक संघ मुंबई – नवशक्ती व फ्रीप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने  सन्मानित करण्यात आले. जनजागृती तसेच समाज  उभारणीचे दीपस्तंभ व समाज विधायक करीत असलेल्या ध्येयवादी व प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांचा सन्मान करून,या सेवाभावी कार्याबद्दल मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर मुंबई महानगर पालिका आयुक्त.भूषण गगराणी,ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक विनय हर्डीकर,दैनिक नवशक्ती कार्यकारी संपादक  प्रकाश सावंत  ,मुंबई वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष  रवींद्र  मालसुरे ,वृत्तपत्र संघाचे सर्व पदाधिकारी,सर्व सन्माननीय वृत्तपत्र लेखक ,पत्रकार, इलेक्ट्रिक व प्रिंट मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते..दिनेश तुरे यांना विभागातून सर्व थरांतून सदर सेवाभावी कार्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…व त्यांना पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या…
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments