Monday, November 25, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडऑन ड्युटी २४ तास असलेले पोलिस... प्रसादाबरोबर पौष्टीक आहाराचे वाटप...

ऑन ड्युटी २४ तास असलेले पोलिस… प्रसादाबरोबर पौष्टीक आहाराचे वाटप…

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

गणेशोत्सवाच्या पार्श्वूमीवर उत्साह वाढविण्यासाठी पोलीस बांधवांना प्रसादाचे वाटप  शनिवार दी. ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या दिवशी सकाळच्या सुमारास करण्यात आले…
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पीआय, ट्रॅफिक पोलिस कर्मचारी सह पोलीस शिपाई, होम गार्ड तसेच ट्रॅफिक ड्युटीवर असलेले स्वयंसेवक त्याचबरोबर माणगाव व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्षमण बाळा दळवी, पदाधिकारी, सदस्य आणि व्यापार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते… दरम्यानचा काळात कोकणात मोठ्या प्रमाणाने गणेश भक्त मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येतून हजारो संख्येने आपले खाजगी वाहन, एस्टी, गाडीने कोकणात दाखल होत असतात…गणेशभक्तांना आपल्या गावी व्यवस्थित जाण्यासाठी अहोरात्र पोलीस ऑन ड्युटी काम करीत असतात…याच पार्श्वभूमीवर त्यांचेही आरोग्य सुदृढ राहावे…म्हणून प्रसादा बरोबर पौष्टीक आहाराचेही  वाटप करण्यात आले… दरम्यानचा काळात असे उपक्रम या नामांकित संघटने कडून करण्यात आले.. माणगाव व्यापार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकूण दहा गट तयार करून व्यापार बांधवांच्या सोबत वाहतूक पोलीस चौकी, निजामपूर रोड कॉर्नर, रेल्वे स्टेशन रोड, निजामपूर रोड, कचेरी रोड कॉर्नर, मोर्बा रोड कॉर्नर, दालघर फाटा, अशा विविध मोक्याचे नाका येथे जावून स्वयंसेवक तरूण वर्ग तसेच पोलीस ठाणा, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, माणगाव नगर पंचायत याठिकाणी ऑन ड्युटीवर असलेल्या अधिकारी,कर्मचारी, शिपाई यांना देखील मोदक प्रसादाचे वाटप करण्यात आले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments