Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडजुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट... रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांमूळे अपघाताची...

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट… रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांमूळे अपघाताची शक्यता…?

खोपोली शिवसत्ता टाइम्स खलील सुर्वे 

जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कलोते गावाच्या हद्दीत सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जणू काही या गुरांनी रास्ता रोको केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे… हा राष्ट्रीय महामार्ग टोल पर्याय मार्ग चांगल्या स्थितीत असल्यामुळे वाहनांची दिवस रात्र वर्दळ पाहायला मिळत आहे. अशातच या मार्गावर वाढत्या मोकाट गुरांच्या संख्येमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.गेल्या काही दिवसाआधी एनएमएमटी बसला गुरे धडकल्याने अपघात झाला होता. मात्र या अपघात बसने पलटी खाल्ली असती किंवा बस नाल्यात जाऊन कोसळली असती तर किती मोठी दुर्घटना घडली असती याचा विचार आल्यावर पाया खालची जमीन सरकून जाते.

या मोकाट गुरांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे या गुरांना कोणी वाली आहे की नाही? ही गुरे रस्त्यावरती अशीच मोकाट सोडून देण्यात आली आहेत की काय? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या मोकाट गुरांचे कळपच्या कळप रस्त्याच्या मध्येच उभे व ठाण मांडून बसलेले असतात. यांच्यामागे कोणीच गुराखी वैगरे दिसून येत नाही. तसेच वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ताच मोकळा नसल्यामुळे गाडीचा हॉर्न वाजवूनसुद्धा गुरे बाजूला होत नाहीत. शेवटी वाहनचालकांना गाडी उभी करुन गाडीतून उतरुन गुरांना बाजूला करावे लागत आहेत. तसेच या मोकाट गुरांच्या रस्त्याच्या मध्येच बरेच वेळा झुंज होत असतात. या झुंजीमुळे गाड्यांना अपघात होऊन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. जर का यामध्ये वाहनचालकांची चुकी नसताना एखाद्या गुराला जर धडक बसून अपघात झाला की लगेच मोकाट सोडणार्‍या गुरांचे मालक त्याठिकाणी नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी पुढे सरसावत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात फिरणार्‍या मोकाट गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments