रायगड शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… या घोषात गणेशभक्तांनी अत्यंत भक्तिभावाने बुधवारी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला… यावेळी एकूण ५००० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले….पाच दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचे आगमन झाले. पाच दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पांना निरोप दिला. भक्तिभावाने अवघे श्रीवर्धन न्हाऊन निघाली होते…दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले… श्रीवर्धनमधील चौपाट्यावर गणपती विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती…पाच दिवस मनोभावे आरती, पूजन केल्यानंतर बाप्पाला निरोप देताना आनंदाश्रू तरळले… गेले पाच दिवस भजन, कीर्तन, पूजन, नृत्य, फेर, फुगडी, झीम्मा, जागरण, वेशभूषा, पारंपरिक पद्धतीने नृत्य करण्यात आले. वेगळाच जल्लोष दिसून आला. त्यात गौरीचें आगमन सुद्धा झाले.. नुसती धावपळ, गल्ली बोळात, खेड्या पाड्यात, गावात, चाळीत भक्तिमय वातावरण होते. सगळीकडे गाणी वाजत होती. एकमेकांच्या घरी बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जाता येत होते. प्रसादाची, जेवणाच्या पंगती दिसत होत्या…अश्यातच पाच दिवस कसे गेले कोणालाच कळले नाही. मनोभावे बाप्पाला स्थापना करून भावपुर्ण निरोप देण्यात आला… सगळीकडून बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. डीजे, ढोल -ताशा, बँजो, बँडच्या तालावर गणेश भक्त ठेका धरत होते. श्रीवर्धन चौपाटी समुद्र किनारी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले…