गरोदर महिला, लहान मुली, ग्राहक यांना मारहाण…महामार्गावरील जोशी वडेवाले हॉटेल सध्या चर्चेत…

0
111

माणगाव शिवसत्ता टाइम्स (प्रसाद गोरेगावकर):- 

मुंबई-गोवा महामार्गावर पेणच्या पुढे सध्या काही वर्षात जोशी वडेवाले हॉटेलांचा सुळसुळाट झालाय… त्यातील माणगाव परिसरातील जोशी वडेवाले हॉटेलबाबत लोकांच्या पूर्वीपासून तक्रारी होत्या… जीएसटीच्या नावाखाली ग्राहकाकडून अव्वाच्यासव्वा बिले घेतली जायची… त्याबाबत पूर्वी ओरडही झाली होती… उन्मत्त परप्रांतीय स्टाफ आणि मालकाची दादागिरी अधून-मधून चर्चेत असायची… मात्र यावर बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी कडी झाली… या हॉटेलात खारट वड्यावरून गरोदर महिला, लहान मुली, ग्राहक यांना मारहाण झाली… सध्या या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे…हॉटेलला नाव मराठी माणसाचे… आणि मराठी माणसालाच मारहाण म्हणून सत्यशोधन केले असता… जोशी वडेवाले हॉटेलला नाव मराठी माणसाचे असून, चालविणारे परप्रांतीय असल्याचे पुढे आले आहे… जोशी वडेवाले या मराठी माणसाने आपल्या नावाचा ब्रँड तयार केला असून तो ब्रँड परप्रांतीयास चालविण्यास दिला आहे… पोलिसात दाखल तक्रारीवरून हॉटेल चालविणारे जैस्वाल कुटूंबीय असल्याचे दिसत आहे… मारहाण झालेला हेलगावकर परिवार मूळचा कोकणातील असून, ते सध्या नवी मुंबई घणसोली येथील म्हात्रे आळीत देवभूमी अपार्टमेंटमध्ये राहतात…  माणगावमधील मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या जोशी वडेवाले हॉटेलमध्ये हेलगावकर परिवार नाश्ता करण्यासाठी थांबला होता… यावेळी मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या ग्राहकाची होती… त्यावरून शब्दाला शब्द वाढत गेले आणि तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदाराला दम देऊन शिव्या देण्यास सुरूवात झाली… या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या परप्रांतीयांनी हॉटेल मालकासह गरोदर महिला, 2 छोट्या मुली, पुरुषांना मारहाण केली… या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने हॉटेलविरुद्ध दंड थोपटले आहेत… महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुन त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत झाल्याचे समोर आले आहे. तसेच, 2 मुलींना नखाने ओरबाडे काढून त्यांना देखील हॉटेलचालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या घटनेसंदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे… आरोपी शुभम ग्यानचंद जैस्वाल, त्याचे वडील, आई, बहीण तसेच हॉटेलात काम करणारे ५ कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे..