महाड शिवसत्ता टाइम्स ( निलेश लोखंडे ) :-
महाड तालुका ही छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचे अग्रस्थान असल्याने महाड तालुक्याला महाराष्ट्रातील भौगोलिक शहर म्हणून ओळख प्राप्त आहे…या महाड तालुक्यामध्ये खेड्यापाड्यातील जनतेच्या सेवेसाठी महाड पंचायत समितीची स्थापना करण्यात आली आहे…या पंचायत समितीची इमारत नवीन बांधली असून गेली बरेच वर्षे झाली ही इमारत बांधून या इमारतीला पूर्णपणे तडे गेलेले आहेत.. इमारतीच्या अवतीभवती सुद्धा तडे गेल्याने ही इमारत कधीही उचलू शकते…या प्रकरणाकडे प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते…प्रशासनाने त्या इमारती संदर्भात एक ठराव घेऊन या इमारतीची डागलूजी करायला पाहिजे होती परंतु त्या इमारतीच्या डागडूजीकडे महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते…त्यांनी तात्काळ इमारतीची डब्लूजी करून घ्यावी… यामुळे ही इमारत कोसळण्यापासून अबाधित राहील… इमारतीची डब्लूजी लवकरात लवकर करण्याची मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे.