कळंबोली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे…पनवेल पालिका हद्दीमधील कळंबोली गावातील एका रहिवाशी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी घडली आहे… स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे…सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या स्फोटामुळे झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे… प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सृष्टी रहिवाशी संस्थेतील ६ मजल्यावर असलेल्या सी ६०१ क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे तीन सिलेंडर ठेवण्यात आले होते…यापैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटर अंतरापर्यत ऐकू गेला आहे…स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील घराची बाहेरील भिंत पूर्णपणे तुटली असून, तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडे देखील इमारती खाली विखूरले आहेत. महत्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती मिळाली नसून, घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत…स्फोट झालेला सिलेंडर घराच्या हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. त्या सिलेंडरचा वापर नसताना देखील सिलेंडरचा स्फोट कशामुळे घडला याबाबत माहिती घेण्यासाठी भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिलेंडर कुठे तरी लीक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या स्पार्कच्या संपर्कामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर घरामधील सर्व वस्तू जाळून खाक झाल्या आहेत…
सिलेंडरच्या स्फोटाने कळंबोली हादरली…स्फोटात घरांचे मोठे नुकसान…वस्तू जळून खाक…
RELATED ARTICLES