Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटकमध्ये पोलिसांनी केले गणपतीचे रक्षण...प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एवढे खोटे बोलू नका...

कर्नाटकमध्ये पोलिसांनी केले गणपतीचे रक्षण…प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एवढे खोटे बोलू नका…

 वर्धा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-

एक खोटे १० वेळा ओरडून सांगितले… तर ते खरे वाटू लागते…याला गोबेल्सि प्रचार म्हणतात… हिटलरचा सेनापती गोबेल्स याने ही रणनीती अंमलात आणली होती… या रणनीतीचा देशभरात भाजपवाले पुरेपूर उपयोग करीत आहेत…भाजपवाल्यांना यात साथ त्यांच्या मीडिया साथीदारांची आहे…सध्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडत आहेत… महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात लहान मुलांनी गणपती विसर्जनमिरवणुकीवर दगडफेक केली होती… या लहान मुलांना कोणीतरी सांगितल्याशिवाय ते दगडफेक करू शकत नाहीत… आता हे कोणीतरी कोण आहेत… याचा शोध घेण्याची पोलिसांची जबाबदारी आहे… सुरत,महाराष्ट्र,नंतर कर्नाटक येथे गणपती मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत… या घटना सुनियोजित अशा वाटतात… कारण देशात एक अशी विचारधारा कार्यरत आहे की… त्यांना सतत या देशातील वातावरण अस्थिर रहावे असे वाटते… त्याच विचारांचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे… या सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी वर्धा दौऱ्यावर आले होते… यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला… काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे, असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “या काँग्रेसवाल्यांनी तर आपल्या गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकले आहे…काँग्रेसचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की… त्यांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले… ज्या गणेश मूर्तीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली…           नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर आता जोरदार टिका होत आहे… प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एवढे खोटे बोलू नका… असे लोक सोशल मिडीयावर बोलत आहेत… कर्नाटकमध्ये पोलिसांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले नसून दंगलीमुळे रस्त्यावर गणपतीची विटंबना होऊ नये म्हणून गणपतीचे रक्षण केले… गणपतीला पोलीस व्हॅनमधून सुरक्षितरित्या पोलीस ठाण्यात आणले… जेणेकरून मूर्ती सुरक्षित रहावी… काँग्रेसचा गणेशोत्सवाला कधीही विरोध नव्हता… काँग्रेसच्याच राजवटीत हे सर्व उत्सव सुरु झाले… त्यामुळे प्रधानमंत्रीपदी बसलेल्या नरेंद्र मोदींनी हिंदू जनतेला मूर्ख समजून उगाच खोटे बोलू नये… काँग्रेसमध्येही हिंदू धर्मीय लोक आहेत… ते गणपतीची पूजा करतात… उलट काँग्रेसच्या राजवटीत बाप्पाची विटंबना पोलिसांनी होऊ दिली नाही… सन्मानीय प्रधानमंत्री आपण खोटे बोलू नये असे लोक बोलत आहेत…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments