रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत,गणेश म्हाप्रळकर):-
इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी यांच्या समुद्रातील लुटमार आणि व्यवसायिकांना लुबाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी जंजिरा किल्ला समोर अगदी खोल समुद्रात पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून सुध्दा ओळखले जाते…आज या किल्ल्याला साडे तीनशे वर्ष होत आली.मात्र किल्ल्याचा पाया आणि बहुतांश भाग आजही या खोल समुद्रात उभा आहे.मात्र सद्यस्थितीत या किल्ल्याकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने आज हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्हयातील मनसे आता या बाबत जागरूक झाली असून या किल्ल्याची संपुर्ण पाहणी करून किल्ल्याचें संवर्धन आणि जतन होणे गरजेचे असल्याच त्यांनी सांगितले आहे. एकिकडे पर्यटकांना किल्ल्यावर येण्यासाठी येथे जेटी मंजूर करण्यात आली.. मात्र अद्यापही या जेटीचे काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर आहेत. किल्ल्याचा संपूर्ण भाग हा आजच्या स्थितीत ढासळत असुन भविष्यात या किल्ल्याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले नाही तर हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पाहुयात काय आहे या किल्ल्याची अवस्था आणि संपूर्ण प्रकार