पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान… आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन…

0
114

पनवेल शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर ):-

पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते आज दि. २१ सप्टेंबर करण्यात आले….या वेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख, समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी प्रार्थना केली.
या गौरा गणेशोत्सवाचे यंदाचे ३२वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत शांततामय साजरा केला जात असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष एस.के. नाईक यांनी या वेळी सांगितले. त्यांच्यासमवेत गौरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक, सचिव दिलीप अनभुले, इतर पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते. सर्वांचे आकर्षण असलेल्या या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी होत असते…