नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :-
मागील काही महिन्यांपासून नेरळ शहरात फसवणुकीच्या घटना अधिक घडत असून विविध ठिकाणी जॉब लावून देतो, असे सांगत मोठी रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे…दरम्यान,अशीच एक घटना आता रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातील नेरळ परिसरात घडल्याचे समोर आले आहे…नेरळ पोलीस ठाणे हद्दीत युवराज रेसिडन्सीमध्ये राहणारा संकेत कांबळे हा मंत्रालयातील अधिकारी आहे असे अनेकांना भासवत असून सरकारी नोकरीला लावतो, तर काहींना सरकारी बदली करून देतो तर कोणाकोणाला जागा आणि-जमिनीचे व्यवहार करून देतो असे सांगून अनेकांना लाखोचा गंडा घालत होता… एका मुलीला नोकरी लावतो असे सांगितले…नोकरीसाठी तिने लग्नासाठी केलेले दागिने मोडून पैसे दिले…मात्र अद्याप देखील आरोपीने नोकरीला लावलेच नाही…या घटनेने तिचे कुटुंब कर्जबाजारी झाल्याचे समोर येत आहे…तर पोलीस अधिकाऱ्याची बदली करून देतो असे सांगून एकाला लाखो रुपयाचा गंडा घातला…याशिवाय नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांना जमिनीचा व्यवहार करून देतो म्हणून लाखो रुपयांचा गंडा घालून नेरळ येथून ५ वर्षांपूर्वी पलायन केले होते…याच भामट्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कोर्टात केस चालू आहे…
सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी हा APMC नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्याला सापळा रचून अटक करण्यात आली…आरोपीला कोर्टाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनवली आहे…त्याच्यावर याआधी देखील कराड पोलीस ठाणे सातारा, खैरवाडी पोलीस, चेंबूर पोलीस ठाणे अंधेरी पोलीस ठाणे,पनवेल ग्रामीण पोलीस ठाणे,खडक पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा नोंद असल्याचे समोर येत आहे… याशिवाय अन्य काही गुन्हा दाखल आहे का ?याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व त्यांची टीम करीत आहे….