खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन कळंबोलीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.भाजपा सचिव डॉ. संतोष गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.हा पक्ष प्रवेश सोहळा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला तर शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून टाकले. डॉ. गायकवाड यांच्यासह विजय पाटील, राजेंद्र कदम, बाजीराव साठे, शंकर, प्रभाकर पाटील, दगडू पाटील, रुपेश धावडे, विष्णू मर्ढेकर, भानुदास जगदाळे आदींनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये जाहीर प्रवेश केला.तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये सौ. भारती श्रीराम, सौ. वंदना देवरे, सौ. हर्षणा मर्ढेकर, सौ. संजना आगलावे, सौ. अभिषा आरेकर, सौ. अल्का वांगडे, सौ. प्रियांका धनवे, सौ. मंगल देवरे, सौ. सुवर्ण चव्हाण यांनीही भाजपाचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख आत्माराम गावंड, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर संघटक अक्षय साळुंखे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, सौ. टिया अरोरा धुमाळ, संपर्क संघटिका सौ. समीक्षा पांगम, शहर संघटिका सौ.ज्योती मोहिते, सौ. निशा जाधव, यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली असून भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे.