Friday, November 22, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमहायुतीच्या पाठीशी का उभे रहायचे  ते जन सन्मान यात्रेच्यानिमित्ताने जनतेपर्यंत  पोहोचावे:ना.अजित  पवार

महायुतीच्या पाठीशी का उभे रहायचे  ते जन सन्मान यात्रेच्यानिमित्ताने जनतेपर्यंत  पोहोचावे:ना.अजित  पवार

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-
 
        सर्वच कष्टकरी महिलांना जगण्याचा अधिकार आहे.तो त्यांना मिळण्याचे दृष्टीने आम्ही एकत्र बसून
निर्णय घेतले.त्यातून’ लाडकी बहीण योजना’ उदयाला आली. असे उदगार उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी
दि.21 रोजी श्रीवर्धन  येथे बोलतांना काढले. 
     र.ना.राऊत हायस्कूलच्या पटांगणात उभारलेल्या भव्य शामियान्यात जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा ते बोलत होते.कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी ना.पवार यांनी श्री सोमजाई देवीचे दर्शन  घेतले.प्रारंभी महिला व बालविकास मंत्री ना.आदितीताई तटकरे यांनीप्रास्ताविकात सांगितले की,या मतदारसंघाने नेहमीच आम्हाला भरभरुन साथ दिली आहे.खरी ताकद दादा,तुमच्यामुळे आम्हाला मिळते.
खा.सुनिल तटकरे आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात म्हणाले की,आम्हीशाहू,फुले,आंबेडकरांच्या
भूमिकेपासून जराही मागे गेलो नाही.नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेससह महायुती
निश्चितपणे सत्तेवर येईल. ना.अजित  पवार आपल्याप्रभावी भाषणात पुढे म्हणाले की,माझी लाडकी बहीण योजनेशिवाय महिलांना वर्षात तीन गॅस सिलिंडर  मोफत,मुलींना मोफत शिक्षण, वयोश्री योजना,म.फुले जन आरोग्य योजना,ई-रिक्षाकरिता अर्थ सहाय्य इ.अनेकयोजना या सरकारने सुरु केल्या.
या कार्यक्रमानंतर कुळकर्णी हाॅल मध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या  समस्या
जाणून घेऊन समर्पक खुलासे केले.या वार्तालापात सर्वश्री उदय बापट,वसंत टपळे,देवेंद्र भुसाणे,सिद्धेश पोवार,ओमप्रकाश कोलथरकर, सिद्धेश कोसबे,अरुण सावंत आदिंनी सहभाग  घेतला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments