बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री पराग कांबळे यांनी पदभार स्वीकारला…

0
122

 रत्नागिरी शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी परळ -बळीराज सेनेचा कार्यकर्ता मेळावा शनिवार दिनांक २१ सप्टेंबर२०२४ रोजी मुंबई परळ येथे पक्षप्रमुख अशोकदादा वालाम यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते .
दरम्यान रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी आपले जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आणि कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यभार सर्वांचे उपस्थितीत स्वीकारला.
पक्षप्रमुख अशोक दादा वालाम यांचे सह सर्व पदाधिकारी यांनी पराग कांबळे यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिला.
दरम्यान यावेळी पराग कांबळे यांनी सांगितलं कि माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षा ने मोठे पद देऊन सन्मानित केल या मिळालेल्या संधी चे सोन करू व सर्वसामान्य जनतेची सेवा करून पदा ला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू ..